दगडफेक प्रकरणातील संशयितांची कारागृहात रवानगी
By admin | Updated: July 8, 2016 18:17 IST
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींची शुक्रवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.
दगडफेक प्रकरणातील संशयितांची कारागृहात रवानगी
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींची शुक्रवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याने संशयित आरोपी मोहंमद बिलाल मोहंमद फारूख बागवान, वसीम खान अब्दूल खान, इम्रान अब्दूल खान, मोहसीन शब्बीर बागवान, सैयद कलीम जवरअली, दानेश नासीर हुसेन, अमीर अली मोहंमद अली, मोहंमद जुबेर अब्दूल रहीम खाटीक, शेख जाकीर शेख शकील, ऐनोद्दीन अमिनोद्दीन शेख, सलमान सलीम खान व अल्तमश गुलाम रसूल खाटीक (सर्व रा.जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व संशयितांना न्यायालयाने अटी व शर्तीनुसार ६ व ७ जुलै या दोन दिवसांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. ८ जुलैला हे सर्व संशयित न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.