शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

गोळीबार प्रकरणातील आरोपीस जामीन

By admin | Updated: March 23, 2016 00:12 IST

जळगाव : भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस मंगळवारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. घटनेनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीस अटक झाली होती. अटकेनंतर तो रिमांड होममध्ये होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.आशा शर्मा यांनी तर आरोपीतर्फे ॲड.राशीद पिंजारी यांनी काम पाहिले.

जळगाव : भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस मंगळवारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. घटनेनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीस अटक झाली होती. अटकेनंतर तो रिमांड होममध्ये होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.आशा शर्मा यांनी तर आरोपीतर्फे ॲड.राशीद पिंजारी यांनी काम पाहिले.

अल्पवयीन आरोपीची रिमांड होममध्ये रवानगी
जळगाव : अल्पवयीन बालकावर अत्याचार करून त्याला विहिरीत फेकणार्‍या जामनेर येथील एका अल्पवयीन आरोपीची मंगळवारी न्यायालयाने रिमांड होममध्ये रवानगी केली. जामनेर शिवारात बोदवड रस्त्यावर असणार्‍या शेतातील विहिरीत अत्याचारग्रस्त बालकाचा मृतदेह आढळला होता. ही घटना १९ रोजी घडली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३०२, २०१ सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (१) १२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

तीन आरोपींची कारागृहात रवानगी
जळगाव : मन्यारखेडा, ता.भुसावळ येथील आनंदा पंडित तावडे यांच्यासह त्यांच्या मित्रास अडवून त्यांच्याकडून किमती ऐवज जबरीने हिसकावणार्‍या तिघांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. किरण कैलास पाटील (२५, रा.पुणे), विकास हनुमंत पठारे (२२, रा.मेहरूण, जळगाव) व राुहल मधुकर शिंदे (२१, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) अशी तिन्ही संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले होते. आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी तर सरकारतर्फे ॲड.अनिल पाटील यांनी काम पाहिले.

बलात्कार्‍यास न्यायालयीन कोठडी
जळगाव : अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणारा संशयित आरोपी चेतन चंद्रकांत चौधरी (रा.जोशीवाडा, जळगाव) यास न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३६३, ३२४, ५०४ सह पोस्को ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी तर सरकारतर्फे ॲड.संभाजी जाधव यांनी काम पाहिले.