शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतील आरोपी आमदारास झेड सुरक्षा

By admin | Updated: August 27, 2014 00:48 IST

मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आणि उत्तर प्रदेशच्या सरधना मतदारसंघाचे भाजपा आमदार संगीत सोम यांना झेड सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़

लखनौ : मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आणि उत्तर प्रदेशच्या सरधना मतदारसंघाचे भाजपा आमदार संगीत सोम यांना झेड सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़ सोम यांच्या जीवाला धोका असल्याची सूचना गुप्तचर विभागाने दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सोम यांना झेड सुरक्षा कवच पुरविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे़ याउलट भाजपाने सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे़ गुप्तचर विभागांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारावर सोम यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात काहीही गैर नसल्याचे भाजपाने म्हटले आहे़उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व्यवस्था) अमरेंद्र सिंह सेंगर यांनी आज मंगळवारी सोम यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरविण्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला़ ते म्हणाले की, आम्हाला केंद्र सरकारकडून पत्र मिळाले आहे़ यात भाजपा आमदार संगीत सोम यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ हे पत्र संबंधित सुरक्षा संस्थेकडे पाठविण्यात आले आहे़ गतवर्षी सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ६० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर ९० जण जखमी झाले होते़ सोम यांच्यावर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रक्षोभक व्हिडिओ अपलोड करणे तसेच विखारी भाषण देण्याचा आरोप आहे़ (वृत्तसंस्था)