शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांमुळे तोंड लपवावे लागते...; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:06 IST

जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने व बेशिस्तपणामुळे देशात सर्वाधिक अपघात होत असल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नियमांचे पालन न झाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात माझ्या स्वत:च्या कारचा दोन वेळा दंड भरावा लागल्याचे लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना गडकरींनी स्पष्ट केले. 

जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. लोकांना, विशेषत: तरुणांना वाहतूक शिस्तीच्या नियमाबद्दल प्रबोधनाची तर लहान मुलांना नियमांचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लोकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले.

अपघात मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे nदेशातील रस्ते अपघाताचा विक्रम एवढा वाईट आहे की जागतिक परिषदेत तोंड लपवावे लागते. nरस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अपघाताची मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे, असे गडकरी म्हणाले. 

४७४ लाेकांचा रस्ते अपघातात दरराेज भारतात मृत्यू हाेताे.१.७ लाख लाेकांचा २०२३ मध्ये मृत्यू झाला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभा