मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन ठार
By admin | Updated: September 28, 2015 21:51 IST
पनवेल : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन ठार
पनवेल : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.महामार्गावर कळंबोलीजवळ भरधाव वेगाने आलेल्या इंडिका कारने (एमएच ०४ , एफजे १४२९ ) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. कारचालक दीपक उत्तम माने (३५, रा. घाटकोपर), दादासाहेब पाटील ( ३५, रा. घाटकोपर) अशी मृतांची नावे अहेतृ, तर कुमार उत्तम माने ( ३२) , रेखा कुमार माने (२८) व दीड वर्षाची पूर्वा कुमार माने हे तिघे जखमी झाले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून एक्स्प्रेस वेवर गाडी थांबविण्याची परवानगी नसताना टेम्पो उभा केल्याबद्दल टेम्पोचालक मुकेश पाल याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने पुण्याला जात असताना कळंबोली येथून ३ किमीच्या अंतरावर मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. टायर पंर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने धडक दिल्याने हा अपघात झाला. (प्रतिनिधी)फोटो - 28पनवेल ॲक्सिडन्ट (छायाचित्रकार - भालचंद्र जुमलेदार )