शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात सीबीआयला प्रवेश बंद; राज्य सरकारने अधिसूचना घेतली मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:45 IST

कर्नाटकात आता राज्य सरकारच्या परवानगीशिवाय केंद्रीय तपास एजन्सी तपास करु शकणार नाहीत.

कर्नाटक सरकारने काल गुरुवारी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत एक मोठा निर्णय घेतला. सीबीआय, ईडी या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आता कर्नाटक सरकारच्या परवानगीशिवाय कर्नाटकात तपास करु शकणार नाहीत, राज्य मंत्रिमंडळाने याबाबत काल याआधीची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसापासून कर्नाटकात  MUDA जमीन घोटाळ्याचे प्रकरण चर्चेत आहे, या दरम्यानच आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता हा निर्णय म्हणजे राजकीय असल्याचा आरोपही सुरू आहे. 

डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...

देशात सीबीआयची स्थापना १९४१ मध्ये झाली. यावेळी SPE चे काम दुसऱ्या महायुद्धात भारताच्या युद्ध आणि पुरवठा विभागासोबत झालेल्या व्यवहारातील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणे हे होते. युद्ध संपल्यानंतरही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या एजन्सीची गरज भासू लागली. त्यामुळे १९४६ मध्ये दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा लागू करण्यात आला. सीबीआयला प्रकरणांचा तपास करण्याचा अधिकार या कायद्यातून प्राप्त झाला आहे.

दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट  कायदा, १९४६ च्या कलम ६ नुसार, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला त्याच्या अधिकारक्षेत्रात तपास करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांची संमती आवश्यक आहे. पण, सीबीआय फक्त केंद्रशासित प्रदेशांमध्येच स्वत:हून चौकशी करण्याचे अधिकार आहे, अनेक राज्य सरकारांनी सीबीआयला राज्यात तपास करण्यासाठी यापूर्वीच सर्वसाधारण संमती दिली आहे. कर्नाटकातही हीच स्थिती होती. मात्र आता राज्य सरकारने ही संमती मागे घेतली असून आता चौकशीपूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटक