शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:34 IST

जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले. 

वक्फ सुधारित विधेयकाविरोधात दिल्लीत विरोधी लोकांची एक बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये राज्यसभेचे माजी खासदार मोहम्मद अदीब सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आमचे उपकार माना, मोहम्मद अली जिना यांना मुस्लिमांनी नकार दिला नसता तर पाकिस्तानची सीमा लखनऊपर्यंत असली असती, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. 

मी गेली ५० वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. आज आम्ही आमच्याच भागात गुन्हेगारासारखे राहत आहोत. आता तर देशद्रोही देखील झालो आहोत. असे लोक पाहिलेत जे आमच्यासोबत रोज असायचे परंतू राजकीय करिअरसाठी ते आम्हाला आमच्या नशीबावर सोडून गेले आहेत. जे लोक पाकिस्तानला गेले त्यांच्यावरील दोष आम्हाला देण्यात आले, असे अदीब म्हणाले. 

जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आम्ही तर आमचे रक्त वाटले होते. जिनांना आम्ही नकार दिला होता आणि ठोकरले होते. आम्ही लियाकत अली खानना मानले नाही तर आम्ही नेहरू, गांधी आणि आझाद यांना मानले होते. आम्ही जिनांसोबत गेलो नाही, हे उपकार सरकारने मानायला हवेत. असे झाले नसते तर पाकिस्तान लाहोरपर्यंत नाही तर लखनऊपर्यंत बनला असता, असे वक्तव्य अदीब यांनी केले आहे. 

आमच्याकडे काहीही शिल्लक नाही. तुम्ही लोक आमची ताकद आहात. आम्ही अलिगडमध्ये शिकत होतो, तेव्हा राजकीय मंडळी म्हणायची की साहेब रागावतील. तुम्ही आम्हाला शिक्षा करताय आणि आमच्यावर अत्याचार करताय. आत्तापर्यंत आमच्यावर जेवढे हल्ले झाले त्यात सर्वात मोठा हल्ला आमच्या स्टेटसवर आहे. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तान