शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील शिक्षणसंस्थेतून तब्बल ३० कोटी रुपये केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 04:48 IST

प्राप्तिकर खात्याची कारवाई; मोठे करचोरी प्रकरण उघड

नवी दिल्ली : एका व्यावसायिक समूहातर्फे चालविण्यात येणाऱ्या तामिळनडूतील शिक्षण संस्थांवर प्राप्तिकर विभागाने छापे घालून ३0 कोटी रुपये हस्तगत केले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई नमक्कल, पेरुंदुराई व करूर या शहरांत हे छापे घालण्यात आले होते.

हे बेहिशेबी रक्कम संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया एका शाळेच्या सभागृहात दडवून ठेवण्यात आली होती. या संस्थेने सुमारे १५0 कोटी रुपयांची रक्कम घोषित केलेली नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे. छापे अद्याप सुरू आहेत. मात्र या संस्थेचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांकडून मिळालेली फीची रक्कम न दाखविता संस्थेने मोठ्या प्रमाणात करचोरी केली, असे प्राप्तिकर खात्याला आढळून आले आहे.

हिशेबाची वही घेतली ताब्यातविद्यार्थ्यांकडून फी म्हणून मिळणाºया रकमेची वेगळ्या वहीमध्ये नोंद करण्यात येत असे. ती वहीही ताब्यात घेण्यात आली आहे. जमा झालेली ही रक्कम संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या बनावट बँक खात्यात ठेवण्यात येत असे वा ती कर्ज म्हणून घेतल्याचे दाखवण्यात येत असे. या रकमेतून स्थावर मालमत्ता घेण्यात येई आणि कर्मचाºयांनी ती संस्थेला भाड्याने दिली आहे, असे दाखवले जाई, असे अधिकाºयांनी सांगितले. अनेक कर्मचारी व शिक्षक यांना मोठा पगार दिल्याचे दाखवण्याात येत असे तसेच त्यांचा हिशेबही वेगळ्या वहीमध्ये ठेवला जाई, असेही अधिकाºयांना तपासात दिसून आले आहे.