शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे क्रूरताच, आदेश कायम ठेवत हायकोर्टाने महिलेला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:47 IST

Court News: पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे हे क्रूरता असून,  पत्नीनेच स्वत:च्या कुकर्माने कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले, असे इंदूर कोर्टाने म्हटले आहे.   इंदूर खंडपीठात न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि न्यायमूर्ती विनोद द्विवेदी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

इंदूर - पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे हे क्रूरता असून,  पत्नीनेच स्वत:च्या कुकर्माने कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले, असे इंदूर कोर्टाने म्हटले आहे. इंदूर खंडपीठात न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि न्यायमूर्ती विनोद द्विवेदी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. घटस्फोट प्रकरणात पत्नीने पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात केला होता. कौटुंबिक न्यायालयाने याला क्रूरता ठरवून घटस्फोटाला योग्य मानले. महिलेने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि घटस्फोटाचा गुन्हा दाखल केला होता.

कोर्ट म्हणाले...या निर्णयात न्यायालयाने पत्नीवरही भाष्य केले आहे. पत्नीनेच स्वत:च्या कुकर्माने कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले आहे, असे उच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटले.

१२ ते १५ दिवसच सासरी राहिली, परत आलीच नाही- कौटुंबिक न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित शिक्षा सुनावली होती. याला महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कोर्टाने आदेशात म्हटले की, महिलेच्या पतीने प्रतिज्ञापत्रात माहिती दिली की, ती लग्नानंतर केवळ दोनदाच त्याच्या घरी आली होती. फक्त १२-१५ दिवसांसाठी ती सोबत राहिली. - २०१७ पासून ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. या दरम्यान, ती सासरच्या घरी ती गरोदर राहिली आणि नंतर सासरच्या घरी येण्यासही तिने नकार दिला. तिचा पती, ननंद आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही तिने दाखल केला होता. यानंतर, तिने गर्भपातही केला.

निर्णय योग्यचपत्नीने आपल्याला न सांगता गर्भपात केल्याचे पतीने न्यायालयात सांगितले. याला कनिष्ठ न्यायालयाने चुकीचे ठरविले होते.  आता उच्च न्यायालयानेही पत्नीची ही कृती चुकीची असल्याचे म्हटले आहे. यासोबतच महिलेने दाखल केलेला हुंडाबळीचा खटलाही बंद करण्याचा निर्णय दिला होता. या आधारावर दिलेला घटस्फोटाचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत  महिलेची याचिका फेटाळली.

 

टॅग्स :Courtन्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश