शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अबूचा खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालवावा - एनआयए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2015 03:12 IST

लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी तथा २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड अबू जिंदाल याच्या जिवाला धोका असल्याने खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालवावा अशी

नवी दिल्ली : लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी तथा २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड अबू जिंदाल याच्या जिवाला धोका असल्याने खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालवावा अशी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली न्यायालयाला शुक्रवारी केली.अबू जिंदाल ऊर्फ सय्यद झैबुद्दीन अन्सारी सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असून त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्याला दिल्लीच्या न्यायालयात हजर करता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मे २०१३ साली पारित केलेल्या ठरावात प्रतिस्पर्धी गटाकडून त्याचे अपहरण आणि हत्या होण्याची भीती व्यक्त करतानाच त्याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर न करण्याचा निर्णय घेतला होता, याकडेही या संस्थेने लक्ष वेधले. दुसरीकडे जिंदालचे वकील एम.एस. खान यांनी बाजू मांडताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याला विरोध दर्शविला. मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आधारे माझ्या अशिलाची बाजू योग्य प्रकारे मांडता येणार नाही, त्याचा बचावावर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले. मी अबू याला पत्र पाठवून त्याचे मत मागणार आहे, असे खान यांनी म्हटल्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी ५ आॅगस्ट रोजी निश्चित केली आहे. (वृत्तसंस्था)