अभिजित : नीरेत सहकार पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
बाजार समिती निवडणूक : पणनची जागाही बिनविरोध
अभिजित : नीरेत सहकार पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध
बाजार समिती निवडणूक : पणनची जागाही बिनविरोध सासवड : नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कृषी पतसंस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून ज्ञानदेव ऊर्फ माऊली कोंडीबा वचकल यांची, तर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून बापू सदाशिव औचरे यांची बिनविरोध निवड झाली असून पणन मतदार संघातून सतीश शिवाजीराव काकडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांचीही निवड बिनविरोध झाली. पुरंदर तालुका व बारामती तालुक्याचा काही भाग कार्यक्षेत्र असणार्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत असून यामध्ये एकूण १९ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर उर्वरित १६ जागांसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज आले आहेत. आज (दि. २७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. सहकार पॅनलच्या निवडून आलेल्या उमेदवारांचे काँग्रेसचे युवा नेते संजय जगताप, राष्ट्रवादीचे नेते विजय कोलते, बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, पुरंदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी पोमण, पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, ज्येष्ठ नेते नंदकुमार जगताप, पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप धुमाळ आदींनी अभिनंदन केले. फोटो : १) बापू औचरे २) माऊली वचकल ३) सतीश काकडे