अभिजित कोळपे बातमी : सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
महेश पोखरकर : खोरला शेतकरी प्रशिक्षणवर्ग अभियान
अभिजित कोळपे बातमी : सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे
महेश पोखरकर : खोरला शेतकरी प्रशिक्षणवर्ग अभियानखोर : भरडधान्य उत्पादन कार्यक्रमातून रब्बी ज्वारी पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी ज्वारीच्या पिकाचे मूल्यवर्धन कशा प्रकारे करावे, प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ज्वारीपासून विविध उपपदार्थ तयार करणे, ज्वारीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी व्यवस्थापन खर्चात बचत करून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत महेश पोखरकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.दौंड तालुका कृषी अधिकारी प्रदीप घाडगे व मंडल कृषी अधिकारी यवत येथील माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या खोरमधील हरिबाचीवाडी, खडकवस्ती येथे शेतकरी प्रशिक्षणवर्ग शिबिराचा कार्यक्रम पार पडला. ज्वारी पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रामुख्याने पेरणीची पद्धती, रासायनिक खतांचा संतुलित वापर, सुधारित वाणांचा वापर करावा, असे या वेळी पोखरकर यांनी सांगितले.या वेळी प्रमोद ताकवणे, कृषी सहायक आर. के. पवार, शेतकरी प्रशांत चौधरी, लक्ष्मण चौधरी, तात्या चौधरी, छगन चौधरी, महामुद पठाण, संजय टिळेकर तसेच शेतकरी गटांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होेते.फोटो ओळ : खोर (ता. दौंड) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांच्या शेतजमिनीची पाहणी करताना कृषी अधिकारी व शेतकरी वर्ग.22012015-िं४ल्लि-11संपादन : अभिजित कोळपे