अभिजित कोळपे बातमी : इंदापूर तालुक्यात शेतमजुरांना सुगीचे दिवस
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
वडापुरी : इंदापूर तालुक्यात शेतातील काम करण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजुरी जास्त मिळत असल्याने शेतात कामासाठी मजुरांना चंागले दिवस आले आहे. पूर्वी पायी जाणार्या शेतमजुरांनी नेण्यासाठी चक्क चारचाकींचा उपयोग केला जात आहे.
अभिजित कोळपे बातमी : इंदापूर तालुक्यात शेतमजुरांना सुगीचे दिवस
वडापुरी : इंदापूर तालुक्यात शेतातील काम करण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजुरी जास्त मिळत असल्याने शेतात कामासाठी मजुरांना चंागले दिवस आले आहे. पूर्वी पायी जाणार्या शेतमजुरांनी नेण्यासाठी चक्क चारचाकींचा उपयोग केला जात आहे.वडापुरी परिसरामध्ये शेतकर्यांनी ज्वारी, मका, हरभरा, गहू आदी पिके घेण्यात आली आहेत. सध्या पिके काढणीसाठी आली आहेत. मात्र, या परिसरात सध्या मजुरांचा तुटवडा आहे. मजूरटंचाईमुळे शेतकर्याला घरादारासहित शेतात रात्री उशिरापर्यंत राबावे लागत आहे. वडापुरीच्या जवळ असलेल्या निमगाव केतकी, रामकुंड, वरकुटे खुर्द, अभंगवस्ती या भागात डाळिंब बागांचे क्षेत्र वाढले आहे. साहजिकच डाळिंब उत्पादकांकडून मजुरांची मागणी वाढली आहे. मजुरांनाही एकाच ठिकाणी एक आठवडा काम असल्याने मजूर बाहेरगावी कामासाठी जात आहेत. त्यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे. जो मालक मागणीप्रमाणे मजुरी देतात, त्यांच्याच शेतीमध्ये मजूर जाऊ लागला आहे.