शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ABG Shipyard Scam: 'NDAच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली', एबीजी घोटाळ्यावरुन अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:11 IST

ABG Shipyard Scam: 'एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले.'

नवी दिल्ली: सध्या देशात एबीजी शिपयार्ड प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन विरोधक केंद्रावर टीका करत आहेत. दरम्यान, यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले. सोमवारी RBI बोर्ड सदस्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणावर बोलताना बँकांचे कौतुक केले आणि एनडीएच्या काळात बँकांमध्ये मोठी सुधारणा झाल्याचे त्या म्हणाल्या.

'यूपीएच्या काळात खाते बदलले'यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या प्रकरणात बँकांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी या प्रकारची फसवणूक शोधण्यासाठी सरासरीपेक्षा कमी वेळ घेतला. अशा प्रकरणांचा शोध घेण्यासाठी आणि पुढील कारवाई सुरू करण्यासाठी बँकांना 52 ते 56 महिने लागतात. पण, एनडीएच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

सीबीआयची कारवाईविशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने अलीकडेच ABG शिपयार्ड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवर ICICI बँकेच्या नेतृत्वाखालील दोन डझन कर्जदारांच्या संघाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण घोटाळा 22,842 कोटी रुपयांचा आहे.

आठ जणांवर गुन्हा याअंतर्गत कंपनीने 28 बँकांकडून कर्ज घेतले आहे. सीबीआयने या प्रकरणी 7 फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता. यानंतर तपासाअंती छापे टाकून कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेली फसवणूक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या एकूण घोटाळ्याएवढी आहे.

काँग्रेसचा भाजपवर आरोपकाँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी एबीजी शिपयार्ड कंपनीच्या 22 हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्याबाबत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेचा पैसा लुटायचा, मग पळून जायचे, अशा रणनीतीवर सरकार काम करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.

मोदींच्या मित्रांचे अच्छे दिनट्विटमधून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मोदींच्या काळात 5,35,000 कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाली आहे. जनतेच्या पैशाची एवढी हेराफेरी 75 वर्षांत कधीच झाली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठीच चांगले दिवस आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनfraudधोकेबाजीbankबँक