शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 08:05 IST

मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी मंगळवारपासून सुरू हाेणारे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अपहरणाची खळबळजनक घटना सोमवारी समोर आली. बिष्णुपूर जिल्ह्यातील कामोंग येथे अज्ञात समाजकंटकांनी १७ शाळकरी विद्यार्थिनींचे अपहरण केले. या मुली १२ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. पोलिस व सुरक्षा दलांनी त्यांच्या सुटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे. सुदैवाने तीन मुली ‘अपहरणकर्त्यांच्या’ तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी कारमधून उडी मारली. शाळकरी मुलींच्या अपहरणासाठी अपहरणकर्त्यांनी दोन इको व्हॅनचा वापर केला. मुलींच्या अपहरणामागे खंडणी मागण्याचा हेतू असण्याची शक्यता आहे. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून १५ किमी अंतरावर असलेल्या कामोंग येथील हाओखंबन हायस्कूलमध्ये घडली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी मंगळवारपासून सुरू हाेणारे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

रिकाम्या घरांना लावली आग - मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. राजधानी इंफाळच्या न्यू लॅम्बुलेन भागात रविवारी दुपारी हल्लेखोरांनी तीन रिकाम्या घरांना आग लावली. अन्य एका घटनेत अज्ञात व्यक्तींनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडील दोन एके-४७ रायफलसह तीन बंदुका पळविल्या. - जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात जमलेल्या लोकांनी पोलिस दल व केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांकडे घटनास्थळी जाऊ देण्याची परवानगी मागू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या. 

अधिवेशन पुढे ढकला- मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी रविवारी सरकारला आदिवासींच्या भावना आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन २९ ऑगस्टचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार