शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Aasam Assembly Election: ११ टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल; खून, खुनाचा प्रयत्न अशी गंभीर प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 07:45 IST

शपथपत्रातील माहिती : एडीआरने अहवालात या उमेदवारांच्या आर्थिक परिस्थितीचीही माहिती दिली आहे. त्यानुसार ७३ (२१ टक्के) उमेदवार हे कोट्यधीश आहेत

नवी दिल्ली : आसाम विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांचा कौल मागत असलेल्या ३४५ उमेदवारांपैकी ११ टक्के उमेदवारांनी आमच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती शपथपत्रांत दिली आहे, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) अहवालात म्हटले.

आसाम इलेक्शन वॉच आणि एडीआरने ३४५ उमेदवारांनी शपथेवर दाखल केलेल्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. एक एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. ३४५ उमेदवारांपैकी ३७ (११ टक्के) जणांनी आमच्याविरोधात फाैजदारी गुन्हे तर ३० (९ टक्के) जणांनी आमच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे. एडीआरने अहवालात या उमेदवारांच्या आर्थिक परिस्थितीचीही माहिती दिली आहे. त्यानुसार ७३ (२१ टक्के) उमेदवार हे कोट्यधीश आहेत.

या उमेदवारांनी त्यांच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.३४ उमेदवारांपैकी १० (२९ टक्के) भाजपचे, १९ पैकी तीन (१६ टक्के) आसाम जातिया परिषदेचे, सातपैकी तीन (४३ टक्के) एआययुडीएफचे, सहापैकी दोन (३३ टक्के) एजीपी, २८ पैकी दोन (७ टक्के) काँग्रेसचे आणि एआयएफबी, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि एसयुसीआयच्या (सी) प्रत्येकी एका उमेदवाराने त्यांच्या शपथपत्रांत आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. तीन उमेदवारांनी त्यांच्याविरोधात महिलांबाबतीत प्रकरणे असल्याचे जाहीर केले आहे. यातील एकाने त्याच्यावर बलात्काराचा (कलम ३७६) गुन्हा दाखल असल्याचे नमूद केले आहे. तीन उमेदवारांनी त्यांच्याविरोधात खूनाचे (कलम ३०२) तर दोन उमेदवारांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचे (कलम ३०७) गुन्हे दाखल असल्याचे म्हटले.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?इतर प्रमुख पक्षांमध्ये ३४ उमेदवारांपैकी ११ (३२ टक्के) भाजपचे, २८ उमेदवारांपैकी पाच (१८ टक्के) काँग्रेसचे, सातपैकी पाच (७१ टक्के) जण हे एआययूडीएफचे, सहापैकी दोन (३३ टक्के) हे एजीपीचे, १९ पैकी तीन (१६ टक्के) आसाम जातिया परिषदेचे आणि प्रत्येकी एक उमेदवार एआयएफबी, एसयूसीआय (सी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचा आहे.  

 

टॅग्स :Electionनिवडणूक