शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:55 IST

Arvind Kejriwal : आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

Arvind Kejriwal :  नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या देशातील दोन राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अशातच आता केंद्रशासित प्रदेश आणि देशाची राजधानी दिल्लीतही निवडणुकीची धूम सुरू झाली आहे. आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

यादरम्यान आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणाला तिकीट देण्याचा विचार करत आहे, याबाबत खुलासा केला आहे. आप उमेदवारांना त्यांचे काम, विजयाची शक्यता आणि जनमताच्या आधारे तिकीट देईल, असे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले. 

अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी कोणत्याही नातेवाईक, ओळखीच्या किंवा मित्राला तिकीट देणार नाही. कोणतीही घराणेशाही होणार नाही. मी उमेदवारांचे मूल्यमापन त्यांचे काम, जिंकण्याची शक्यता आणि लोकांचे मत, या आधारावर मूल्यमापन करेन".

पक्षाला देवाचा आणि जनतेचा आशीर्वाद - केजरीवालअरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उत्तर-पश्चिम आणि पश्चिम दिल्लीतील पक्ष कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप नक्कीच जिंकेल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी दावा केला. तसेच, आपने सत्याचा मार्ग अवलंबला असून पक्षाला देवाचा आणि जनतेचा आशीर्वाद आहे, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुका कधी होणार?निवडणुकीच्या तयारीबाबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, केजरीवाल प्रत्येक जागेवर निवडणूक लढवत आहेत हे लक्षात ठेवा. तसेच, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांना केजरीवाल यांनी धार्मिक युद्ध म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीत विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024Politicsराजकारण