शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभेबाहेर 'आप' आमदारांचे 7 तास आंदोलन, विरोधी पक्षनेत्या आतिशी राष्ट्रपतींना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 21:27 IST

सभागृहात गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या 22 पैकी 21 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  दिल्ली विधीमंडळाच्या अधिवेशनात उपराज्यपालांच्या भाषणावेळी गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या 22 पैकी 21 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आज विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि इतर सर्व आप आमदारांना दिल्ली विधानसभा संकुलात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानंतर त्यांनी विधानसभेच्या बाहेर सुमारे 7 तास आंदोलन केले. दिल्लीत सत्तेत आल्यानंतर भाजप हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडत असल्याची टीका आतिशी यांनी केली.

बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढून टाकल्याच्या निषेधार्थ आंदोलन करत असल्याचे आप आमदारांचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने गुरुवारी आप नेत्यांनी विधानसभा संकुलाच्या गेटबाहेर निदर्शने केली. यावेळी आपच्या नेत्यांनी बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जय भीमचा नारा दिल्याने आप आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप आपने केला. तसेच, सुमारे सात तासांच्या आंदोलनानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी उद्या राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे सांगितले. 

विधानसभेच्या आवारात पोलिसांशी वादावादीआप आमदार आतिशी विधानसभेच्या आवारात प्रवेश करत असताना तेथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरच रोखले. यानंतर त्यांची पोलिसांशी जोरदार वादावादी झाली. यादरम्यान, आतिशी यांनी पोलिसांना विधानसभेत प्रवेश का दिला जात नाही, असा प्रश्न केला, ज्यावर पोलिसांनी उत्तर दिले की, 'आप'च्या आमदारांना प्रवेश न देण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. 

राष्ट्रपतींना पत्र लिहून भेटीची वेळ मागितलीआतिशी यांनी राष्ट्रपतींना एक पत्रही लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी दिल्लीतील सरकारी कार्यालयातून बाबासाहेब आणि भगतसिंग यांचे फोटो काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, मला एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे, जो भारतीय लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. दिल्लीतील भाजप सरकारने दिल्ली सरकारच्या विविध कार्यालयांवरून संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद-ए-आझम भगतसिंग यांची छायाचित्रे काढून टाकली आहेत. 

आम आदमी पक्षाने या विषयावर विरोध केला आणि हा गंभीर मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी आमच्या 21 आमदारांना निलंबित केले. आज आम्हाला विधानसभेच्या बाहेर रोखण्यात आले. लोकप्रतिनिधींना विधानसभेत येण्यापासून रोखणे म्हणजे भारताच्या लोकशाही इतिहासावर काळा डाग आहे, असेही त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा