शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Punjab Election Results 2022: 'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 10:29 IST

Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच 'आप'चं सरकार स्थापन होणार आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं पंजाबच्या ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर यश प्राप्त केलं. आम आदमी पक्षाच्या या ऐतिहासिक विजयानंतर आता भाजपाला राष्ट्रीय पातळीवर नवा धोका निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. भाजपा नेत्यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. 

पंजाबमधील 'आप'च्या विजयाचा अर्थ भाजपासाठी धोका असं अजिबात म्हणता येणार नाही, असं भाजपाच्या काही नेत्यांनी म्हटलं आहे. आम आदमी पक्षाला भाजपसोबत लढायचे असेल तर त्यांनी लोकसभेच्या किमान १०० जागा जिंकल्या पाहिजेत, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. पण मुख्य पक्ष म्हणून 'आप'ची वाढ कुठेतरी भाजपविरोधी मतांची विभागणी करेल असंही काहींनी म्हटलं आहे. 

'आप'मुळे भाजपविरोधी मतांची विभागणी होऊ शकते"अँटी बीजेपी मतांची पोकळी आहे. पुढील २० वर्षातही भाजप सत्तेतच राहणार आहे. मात्र, काँग्रेसची स्थिती कमकुवत झाल्यानंतर भाजपविरोधी मते आम आदमी पक्षाच्या बाजूने पडण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून उदयास येण्यासाठी 'आप'ला लोकसभेत किमान 100 जागा जिंकाव्या लागतील. मात्र, 'आप'ची रणनीती काहीशी भाजपच्या रणनितीशी मिळतीजुळती असल्याचे काही नेत्यांनी सांगितले. कारण तेही विकासाचा अजेंडा घेऊन मोठा पक्ष बनू पाहत आहेत", असं भाजपाचे ज्येष्ठ नेते पी.मुरलीधर राव म्हणाले. 

'आप' भविष्यात भाजपला अडचणीत आणू शकते?"आप कल्याणकारी राजकारणात गुंतत आहे आणि एक मजबूत आणि करिश्माई नेत्याच्या (अरविंद केजरीवाल) नेतृत्वाखाली पुढे जात आहे. हा पक्ष दुर्बल घटकांनाही आकर्षित करत आहे. दुर्बल घटकातील मतदारांनीही 'आप'वर पूर्ण विश्वास दाखवला आहे. पुढे जाण्यासाठी हे आपल्यासाठी चांगले सिद्ध होणार नाही. पण अर्थातच पुढे काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही", असंही भाजपा नेते पी. मुरलीधर राव म्हणाले. तसंच महिला आणि दुर्बल घटकांमध्ये AAP ची वाढती लोकप्रियता AAP ला मजबूत आणि मोठा पक्ष बनवू शकते, अशीही कबुली त्यांनी दिली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआप