शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

AAP In Gujarat: राज्यातील सर्व संघटना बरखास्त; गुजरात विधानसभेची आपने आखली रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:28 IST

AAP In Gujarat: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत आप राज्यातील सर्व 182 जागा लढवणार आहे.

Gujarat Assembly Election: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आपनेगुजरातमधीलआपल्या सर्व संघटना बरखास्त केल्या आहेत. गुजरातमध्ये आपचे प्रमुख गोपाल इटालिया वगळता सर्व संघटना बरखास्तर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व संघटना, शाखा आणि मीडिया टीमचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. आता पक्ष लवकरच नव्या संघटनेची घोषणा करू शकतो.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्ष आता पूर्णपणे नवीन संघटना स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील निवडणुकीसाठी पक्षाने आपली पूर्ण ताकद लावली असून आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. नुकतेच केजरीवाल मेहसाणा येथे तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.

लवकरच नवीन नियुक्त्या होतीलपक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते आम आदमी पक्षात दाखल झाले आहेत. अशा स्थितीत त्यांना संघटनेत स्थान देण्यासाठी आणि विधानसभेसाठी रणनीती तयार करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी गुजरातच्या 33 जिल्हाध्यक्षांसह सुमारे 50 पदांवर नवीन नियुक्त्या करणार आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते, माध्यम प्रभारी आदी पदांचा समावेश आहे.

जनतेमध्ये विश्वासार्हता असलेले नेते सहभागी होऊ शकतातआता आपला संघटनेची पुनर्रचना करायची असून, जनतेचा विश्वास असलेल्या लोकांना पुढे आणायचे आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आतापर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही, पण यावेळी काँग्रेसवर नाराज आणि निराश झालेल्या लोकांची मते मिळवण्यात ते यशस्वी होतील, अशी आशा आहे. राज्यातील विधानसभेच्या सर्व 182 जागा लढवण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल