शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वाती मालीवाल प्रकरणी ‘आप’ कोंडीत; केजरीवालांचे मौन, पोलिसांनी नोंदवला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:23 IST

राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची ऐन लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोंडी झाली आहे. 

मालीवाल यांच्या निवासस्थानी तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नाेंदवून घेतला आहे. त्यामुळे ‘आप’वर दबाव वाढला.

आज लखनौमध्ये प्रचारासाठी पोहोचलेले केजरीवाल यांना याप्रकरणी पत्रकारांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले; पण केजरीवाल यांनी मौन बाळगले आणि त्यांचा बचाव संजय सिंह यांना करावा लागला. दिल्लीत महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मालीवाल यांच्याशी झालेले गैरवर्तन, मणिपूरच्या महिलांची निर्वस्त्र धिंड व प्रज्वल रेवण्णाप्रकरणावरुन  संजय सिंह यांनी भाजपवर सवाल करीत प्रश्न परतावून लावण्याचा प्रयत्न केला.

विभवकुमारला अटक का नाही? भाजपचा सवाल

संजय सिंह यांनी कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याऐवजी विभवकुमार केजरीवाल यांच्यासोबत फिरत आहेत आणि याप्रकरणी केजरीवाल यांनी चकार शब्द उच्चारलेला नाही, अशी टीका भाजपच्या प्रवक्त्या शाझिया इल्मी यांनी केली.

विभवकुमारला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

राष्ट्रीय महिला आयोगाने स्वयंस्फूर्तपणे दखल घेत मालीवाल यांना मारहाण करणारे केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांना त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

माझ्यासोबत जे झाले ते अत्यंत वाईट होते. झालेल्या प्रकाराबाबत मी पोलिसांत जाब नोंदविला आहे. मला आशा आहे की, पोलिस यावर योग्य कारवाई करतील. गेले काही दिवस माझ्यासाठी अत्यंत वाईट होते. चारित्र्यहनन करण्यासाठी काही जण म्हणत आहेत की, दुसऱ्या राजकीय पक्षांच्या सांगण्यानुसार मी हे करीत आहे, देव त्या सर्वांना आनंदात ठेवो! - स्वाती मालीवाल, खासदार, राज्यसभा, आम आदमी पार्टी

 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी