पणजी : आम आदमी पार्टी पारंपरिक राजकारण करत नाही. आम्ही प्रामाणिक व स्वच्छ राजकारणाद्वारे सामान्य लोकांना दिलासा देऊ पाहत आहोत, असे ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष यांनी बुधवारी येथे सांगितले. गोव्यात सासष्टी तालुक्यात आप अत्यंत प्रबळ बनला असल्याचेही त्यांनी सांगितले. आशुतोष यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. आशुतोष म्हणाले की, आम्ही पंजाबमध्ये मोठ्या बहुमताने जिंकत आहोत. हे प्रत्येक ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट होत आहे. दिल्लीत आम्ही विधानसभेच्या प्रचंड जागा प्राप्त करू, असे कोणालाच वाटले नव्हते, असे ते यावेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)
‘आप’ पारंपरिक राजकारण करत नाही - आशुतोष
By admin | Updated: October 13, 2016 05:37 IST