शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:08 IST

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा हवाला दिला आहे. 

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने केंद्र सरकारकडे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सरकारी निवासस्थानाची मागणी केली आहे. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा हवाला दिला आहे. 

राघव चड्ढा म्हणाले, विलंब न करता आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना सरकारी निवासस्थान मिळायला पाहिजे. आम आदमी पार्टीने केंद्र सरकारच्या नागरी विभागाला पत्र लिहून कायदेशीर अधिकारांची मागणी केली आहे. तसेच, अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री असताना मिळणाऱ्या सर्व सुविधा सोडणार असल्याचेही राघव चड्ढा यांनी सांगितले.

काही दिवसांत केंद्र सरकारने अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांनुसार सरकारी निवासस्थान उपलब्ध करून द्यावे. अरविंद केजरीवाल दुसऱ्या निवासस्थानी जातील आणि सरकारी सुविधांचा त्याग करून जनतेच्या दरबारात जातील, असे राघव चड्ढा म्हणाले. तसेच, निवडणूक आयोगाच्या कायद्याचा हवाला देत राघव चढ्ढा म्हणाले, निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला २ सुविधा दिल्या जातात. यामध्ये एक म्हणजे राष्ट्रीय कार्यालय दिले जाते. तसेच, पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकालाही सरकारी निवासस्थान दिले जाते.

भाजपवर साधला निशाणा राघव चड्ढा म्हणाले, राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सरकारी निवासस्थान उपलब्ध करून देण्याची आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे. तसेच भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजपला अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही किंमतीत विधानसभेपासून दूर ठेवायचे आहे आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या विधानसभेत राहायचे आहे, जिथे घर मिळणे सोपे काम नाही. नियमानुसार अरविंद केजरीवाल यांना घर मिळायला पाहिजे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप