शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

बवाना पोटनिवडणुकीत 'आप'चा दणदणीत विजय; 24 हजार मतांनी झाला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 16:18 IST

दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देदिदिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे ‘आप’चे उमेदवार रामचंद्र यांचा विजय झाला आहे. आम आदमी पक्षाने तब्बल 24 हजार मतांनी विजयाला गवसणी घातली आहे.

नवी दिल्ली, दि. 28- दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. ‘आप’चे उमेदवार रामचंदर यांचा विजय झाला आहे. आम आदमी पक्षाने तब्बल 24 हजार मतांनी विजयाला गवसणी घातली असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजपा तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. या निवडणुकीत भाजपाकडून वेदप्रकाश, आम आदमी पक्षाकडून रामचंद्र आणि काँग्रेसकडून सुरेंद्र कुमार निवडणुकीच्या रिंगणात होते.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीकारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं चित्र आता पाहायला मिळतं आहे. 

दिल्लीतील बवाना येथे आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये लढत होती. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’साठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. ‘आप’चे रामचंदर हे २४ हजार मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत राम चंदर यांना ५९ हजार ८८६ मतं मिळाली. तर भाजपच्या वेद प्रकाश यांना ३५ हजार ८३४ आणि काँग्रेसच्या सुरेंदर कुमार यांना ३१हजार ९१९ मतं मिळाली.भाजपाचे उमेदवार वेदप्रकाश हे बवाना मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार होते. पण, त्यांनी ‘आप’ला राम राम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे बवानामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. दिल्ली महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर बवाना पोटनिवडणूक म्हणजे आम आदमी पक्षाची एकप्रकारे परीक्षाच होती. तर काँग्रेससाठीही जागा मिळविण्याची पुन्हा एकदा संधी होती. त्यात राजौरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भाजपाने बावनामध्ये कंबर कसली होती. पण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बवानामध्ये बाजी मारली आहे.

बवाना मतदारसंघात सुरूवातीली होती काँटेंकी टक्करदिल्लीच्या बवाना पोटनिवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सुरूवातीला काँटेंकी टक्कर पाहायला मिळाली. मतमोजणी दरम्यान काँग्रेस सगळ्यात पुढे, भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आणि आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. मतमोजणीच्या काही वेळानंतर चित्र पूर्ण बदलायला लागलं होतं. आपचे उमेदवार रामचंद्र यांनी हळूहळू आघाडी घेऊन इतर प्रतिस्पर्धींना मागे टाकलं. सुरुवातील पहिल्या क्रमांकावर असणार काँग्रेस पक्ष पूर्णपणे पिछाडीवर जाऊन थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला. आपच्या उमेदवाराला 24 हजार 052 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. बवानामध्ये 23 ऑगस्ट रोजी पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं होतं. मतदानाच्या दिवशी एकुण 45 टक्के मतदान झालं. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी