शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची जोरदार तयारी, आज पहिली यादी जाहीर करू शकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:22 IST

Aam Aadmi Party : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र त्याआधी दिल्लीत नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आम आदमी पक्षाने (आप) जोरदार सुरु केली आहे. 'आप'ची आज पीएसीची बैठक आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. यासोबतच उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली जाऊ शकते. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र त्याआधी दिल्लीत नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे. अलीकडेच आपचा राजीनामा देत कैलाश गेहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर भाजपचे माजी नेते आणि दोन वेळा आमदार असलेले अनिल झा यांनी आपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी भाजपचे माजी आमदार ब्रह्मसिंह तन्वर यांनीही आपमध्ये प्रवेश केला होता. ते तीन वेळा आमदार आणि तीन वेळा नगरसेवकही राहिले आहेत.

फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांवर निवडणुका होऊ शकतात. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०१५ रोजी संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी कधीही निवडणुका होऊ शकतात. दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

भाजपनेही सुरू केलीय निवडणुकीची तयारीदिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपनेही जोरात केली आहे. गेल्या आठवड्यापासून भाजप दिल्लीतील प्रचाराच्या कामाला गती देणार आहे. त्यासाठी भाजपने विशेष आराखडा तयार केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास १० नगरसेवक आणि माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याची भाजपची तयारी आहे. भाजप या निवडणुकीत मजबूत पकड आणि चांगली प्रतिमा असलेले नगरसेवक रिंगणात उतरवणार आहे.

२०२० मध्ये आपने मिळवला होता दणदणीत विजयदिल्लीत विधानसभेच्या जागांची संख्या १७ आहे. बहुमताचा आकडा ३६ आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी ६२ जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले होते. त्याचवेळी, भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले होते. आपला ५३.५७ टक्के तर भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक 2024