शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

लोकसभेत आम आदमी पार्टीचे पुनरागमन, जालंधर पोटनिवडणुकीत रिंकू विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 14:33 IST

या विजयामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली : जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या सुशीलकुमार रिंकू यांनी काँग्रेसच्या करमजित कौर चौधरी यांचा ५८ हजार ६९१ मतांनी पराभव करीत लोकसभेत आम आदमी पार्टीने पुनरागमन केले. या विजयामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत चालत असताना काँग्रेसचे संतोखसिंह चौधरी यांचे ह्रदयविकारामुळे निधन झाले होते. सुशीलकुमार रिंकू यांना ३ लाख २ हजार ९७, करमजित कौर चौधरी (काँग्रेस) यांना २ लाख ४३ हजार ४५०, डॉ. सुखविंदर सुखी (अकाली दल) यांना १ लाख ५८ हजार ३५४, तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या भाजपच्या इंदर इक्बालसिंह अटवाल यांना १ लाख ३४ हजार ७०६ मते मिळाली. १९९९ पासून काँग्रेसचे जालंधर लोकसभा मतदारसंघावर असलेले वर्चस्व आज मोडीत निघाले.

ओडिशात झारसुगुडा विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ बीजू जनता दलाच्या उमेदवार दीपाली दास यांनी भाजपचे टंकधर त्रिपाठी यांचा ४८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. मेघालयात सोहियोंग विधानसभा मतदारसंघात युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार सिन्शर कुपर रॉय लिंगदोह थबाह यांनी एनपीपीच्या उमेदवाराचा पराभव केला.

उत्तर प्रदेशात अपना दलचा विजय उत्तर प्रदेशात स्वार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सहकारी पक्ष अपना दल (सोनेलाल) चे उमेदवार शफीक अहमद अन्सारी हे विजयी झाले. त्यांनी सपाच्या अनुराधा पटेल यांचा ८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला, तर मिर्झापूर जिल्ह्यातील छानबे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपना दलच्या रिंकी कोल यांनी सपाच्या कीर्ती कोल यांचा पराभव केला. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूक