ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. ५ - स्वतःला आम आदमी म्हणवणारे अरविंद केजरीवाल अति महत्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या सुरक्षा घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
दहा दिवसांची रजा घेत बेंगळुरू येथे उपचाराकरता गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विमानतळावर उतरताच त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा होता. तसेच या गाड्यांवर लालदिवे ही लावण्यात आले होते. विमानतळ ते रुग्णालय असा प्रवास करत असताना केजरीवाल यांच्या गाडीला रस्त्यात लागलेला टोलनाका ही त्यांनी टोल न भरताच पार केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी आप मधील वादांगाबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. जिंदल नेचर केअर मध्ये केजरीवाल उपचार घेणार असून डॉ. बबीना नंदकुमार त्यांच्यावर उपचार करणार आहेत. व्हिआयपी संस्कृतिच्या विरोधात असलेल्या केजरीवाल यांचा बेंगळुरूतील थाट पाहता जनतेने या घटनेवर आश्चर्यव्यक्त केले आहे.