शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सुशांतशी संबंधित 'ते' बनावट ट्विट महागात पडलं; 'आज तक'ला १ लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 09:01 IST

एनबीएसएचा दणका; सुशांतसिंह प्रकरणी चुकीचे वृत्तांकन भोवले

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अ‍ॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.तसेच या प्रकरणाच्या वृत्तांकनात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल आज तक, झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ या वाहिन्यांनी जाहीर माफी मागावी, असाही आदेश एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी दिला आहे.बनावट ट्विटचे प्रसारण करून त्याचा संबंध सुशांतसिंह राजपूतशी जोडल्याबद्दल ‘आज तक’ने वृत्तवाहिनीवरून जाहीर माफी मागावी, असेही या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी सौरव दास यांनी तक्रार केली होती. एनबीएसएच्या आदेशाची माहिती दास यांनी ट्विटरवरून दिली आहे.सत्यता न तपासताच व्हिडीओ केले प्रसिद्धएनबीएसएने म्हटले आहे की, कोणतीही गोष्ट प्रसारित करण्यापूर्वी त्याची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. मात्र, सुशांतसिंह राजपूतशी संबंध जोडून काही ट्विट दाखविताना आज तकने त्याची सत्यता तपासली नाही. या कार्यक्रमाचे यू-ट्युब तसेच ‘आज तक’च्या वेबसाइटवर असलेले व्हिडीओ तत्काळ काढून टाकावेत.‘न्यूज नेशन’ला समज‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीला सुशांतच्या मृतदेहाची दृश्ये दाखविल्याबद्दल एनबीएसएने समज दिली. या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, असे न्यूज नेशनने कळविताच एनबीएसएने वाहिनीवर कारवाई केली नाही. सुशांतसिंहच्या मृतदेहाची क्लोजअप छायाचित्रे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दाखविली नव्हती, याची दखल घेऊन एनबीएसएने या वृत्तवाहिनीवरही कारवाईचा बडगा उगारला नाही.जाहीर माफी मागा‘आज तक’ने जाहीर माफी कधी प्रसारित करावी, त्याचा मजकूर, तारीख, वेळ हे एनबीएसएकडून कळविले जाणार आहे. ही जाहीर माफी प्रसारित केली की नाही, याचा पुरावा असलेली सीडी प्रसारणानंतर सात दिवसांच्या आत ‘आज तक’ला एनबीएसएला सादर करावयाची आहे.‘रिपब्लिक’च्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला समन्समुंबई : टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) रॅकेटप्रकरणी रडारवर असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी रिपब्लिकचे मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुब्रह्मण्यम सुंदरम यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत