शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, म्हणाले- "श्रीराम आमच्यासाठी आस्थेचा विषय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:09 IST

Aaditya Thackeray: "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलोय.''

लखनौ: शिवसेने नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray)  आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते भगवान श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आज सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचे विमान लखनौ विमानतळावर दाखल झाले. 

विमानतळाच्या बाहेर पडताच आदित्य ठाकरेंना माध्यम प्रतिनिधींनी घेरले. यावेळी त्यांना अयोध्या दौऱ्याचा उद्देश विचारण्यात आला. त्यावर आदित्य म्हणाले की, ''आज मी अयोध्येत फक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. यात राजकारणाचा कोणताही भाग नाही. हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलोय,'' असं आदित्य म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "श्रीरामाच्या अयोध्या भूमीत मी कोणतेही राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. आमच्या हातातून चांगले कार्य घडू दे, एवढीच प्रार्थना श्रीरामाच्या चरणी करणार आहे. यावेळी त्यांनी 'जय सियाराम'चा नाराही दिला. आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर आल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शरयू नदीकाठी शक्तिप्रदर्शनआदित्य ठाकरे आज दुपारी रामलल्लाचे दर्शन घेणार असून तत्पूर्वी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यानिमित्ताने बुधवारी रात्री युवासेनेकडून शरयू नदीच्या काठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी मंगळवार सकाळपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात लखनऊत दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या