शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar card : आता बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड; जाणून घ्या UIDAI ची नवीन योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 20:19 IST

Aadhaar card : आता मुलाच्या पालकांना आधार कार्ड तयार करण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही.

नवी दिल्ली : आधार कार्ड संदर्भात महत्वाची बातमी आहे. आता यूआयडीएआय (UIDAI) आपल्या युजर्ससाठी नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले की, यूआयडीएआय अशी योजना बनवत आहे, ज्यामुळेमुलाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल. म्हणजेच आता मुलाच्या पालकांना आधार कार्ड तयार करण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही.

यूआयडीएआय यासाठी एक नवीन योजना तयार करत आहे. आता जन्मलेल्या बालकांना आधार कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयांना दिली जाणार आहे. ही योजना सुरू करण्यासाठी यूआयडीएआय, बर्थ रजिस्ट्रारसोबत मिळून काम करेल आणि त्यासाठी चर्चा सुद्धा सुरू आहेत, असे सौरभ गर्ग यांनी  सांगितले. विशेष म्हणजे, यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी आधार कार्डशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती दिली. यासोबतच त्यांनी यूआयडीएआयच्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात दररोज जवळपास 2.5 कोटी मुले जन्माला येतात. अशा परिस्थितीत यूआयडीएआयची योजना आहे की रुग्णालयात जन्मलेल्या मुलांचे फोटो काढल्यानंतर एकाच वेळी आधार कार्ड जारी केले जाईल. दरम्यान, सध्या 5 वर्षांखालील मुलांच्या आधारासाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, पण जेव्हा त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य होते.

याचबरोबर, 'आता लवकरच भारतात प्रादेशिक भाषांमध्येही आधार कार्ड जारी केले जातील', असे सौरभ गर्ग यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात आधार कार्डवर फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहिती दिली जाते. पण लवकरच आधार कार्डावर कार्डधारकाचे नाव आणि इतर माहिती पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये दिसेल.

आधार कार्ड अनिवार्यविशेष म्हणजे, आधार कार्ड हे भारतातील एक आवश्यक दस्ताऐवज बनले आहे. याशिवाय, आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी लाभांसाठी अनिवार्य दस्तावेज आहे. आमचे आधार कार्ड एक युनिक डॉक्युमेंट आहे, कारण त्यात आवश्यक माहिती असते. आता तर आधार हे मुलांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड