शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत सिंगापूर फिरायला गेलेली महिला क्रूझमधून गायब; मुलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 21:12 IST

पतीसोबत सिंगापूरला फिरायला गेलेली महिला कूझमधून अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ माजली.

इंदूर : पतीसोबत सिंगापूरला फिरायला गेलेली महिला कूझमधून अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ माजली. संबंधित महिलामध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. गायब महिलेचा पती इंदूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आहे. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या मुलाने परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली. क्रूझमधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने समुद्रात उडी मारली पण त्याचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाहीत.

हॉटेल व्यावसायिक जाकेश साहनी यांची पत्नी रिता साहनी क्रूझमधून गायब झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला. ती आपल्या पतीसमवेत चार दिवसांसाठी सिंगापूरच्या दौऱ्यावर गेली होती. लक्षणीय बाब म्हणजे क्रूझ कर्मचाऱ्यांनी महिलेच्या कुटुंबीयांना तिने समुद्रात उडी मारल्याचे सांगितले. मात्र, कोणतेही सीसीटीव्ही फुटेज समोर न आल्याने अद्याप संभ्रम आहे. त्याचवेळी बेपत्ता महिलेच्या पतीला क्रूझमधून उतरवल्याचंही सांगितलं जात आहे.  महिला बेपत्ता झाल्यानं खळबळ जाकेश साहनी आणि पत्नी रीता दोघेही चार दिवसांच्या मलेशिया-सिंगापूर दौऱ्यावर गेले होते. स्पेक्ट्रम ऑफ द सीजवरून दोघेही सिंगापूरला परतत होते. प्रवासादरम्यान पती जाकेश झोपी गेले होते. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा रीता बेपत्ता होती. त्यांनी पत्नीला इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीस लागले नाही. तांत्रिक तपासणी केली असता क्रूझमधून समुद्रात काहीतरी पडल्याचे कर्मचाऱ्यांना समजले. त्यानंतर जाकेश यांनी मुलगा अपूर्व याला घटनेची माहिती दिली.

मुलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या अपूर्व साहनी याने आपली आई बेपत्ता झाल्याचे कळताच पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे ट्विटच्या माध्यमातून मदत मागितली. "माझी आई सिंगापूरहून रॉयल कॅरेबियन क्रूझमधून प्रवास करत होती. आज सकाळपासून ती बेपत्ता आहे. क्रूझ कर्मचारी म्हणत आहेत की तिने समुद्रात उडी मारली, परंतु त्यांनी आम्हाला कोणतेही फुटेज दाखवले नाही आणि ते लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणीही मदत केली नाही, माझ्या वडिलांना क्रूझमधून बाहेर काढले, ही माणुसकी आहे का?", अशा आशयाचे ट्विट बेपत्ता महिलेच्या मुलाने केले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशindore-pcइंदौरsingaporeसिंगापूरWomenमहिला