शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फोडणाऱ्यांपैकी दोघांची कसून चौकशी; न्यायालयाने दिला ३ दिवसांचा रिमांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:16 IST

नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास सुरू केला आहे.

एस.पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी चिंटूकुमार, मुकेशकुमार यांना बुधवारी न्यायालयाने रिमांड दिला. तसा अर्ज सीबीआयने विशेष न्यायदंडाधिकारी हर्षवर्धनसिंह यांच्यासमोर केला होता. या दोघांची आता कसून चौकशी केली जाणार आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बिहारमध्ये फुटल्या होत्या. त्या प्रकरणाची बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (ईओयू) तपास करत होती. मात्र, केंद्राने हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत या प्रकरणात २० लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडविणारे, प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणारे व विद्यार्थी यांचा समावेश आहे. 

नीटसंदर्भातील प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नितीशकुमार, रॉकी, अखिलेशकुमार, सिकंदर यादवेंदू, बिट्टूकुमार, संजीव, अमित आनंद, आयुष राज यांना आरोपी करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तींविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजीव मुखिया व रॉकीवगळून बाकी सर्व आरोपींना तुरुंगात धाडण्यात आले आहे. संजीव मुखिया हा प्रश्नपत्रिका फोडण्याच्या कारवायांमागील सूत्रधार आहे. तो मूळचा नालंदा जिल्ह्याचा राहणारा असून, बिहार सरकारचा कर्मचारी आहे. त्याने आतापर्यंत काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडल्या. सध्या तो फरार आहे. (वृत्तसंस्था)

नीट-यूजीच्या परीक्षार्थीच्या पालकांकडून पैसे उकळणाऱ्यास अटकनीट-यूजीच्या परीक्षेत विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत झळकवू अशा भूलथापा देऊन पालकांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका शिक्षणसंस्थेशी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडण्यात या व्यक्तीचा हात आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारEducation Sectorशिक्षण क्षेत्र