शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वेगवान सफारीची स्कूटरला धडक, ५ फूट हवेत उडली तरुणी; दुसरीला ४ मीटरपर्यंत फरफटत नेलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2023 13:42 IST

होळीच्या दिवशी घडली ही दुर्देवी घटना. घटना सीसीटीव्हीत कैद.

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे होळीच्या दिवशी हर्षिता वर्मा या २२ वर्षीय तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर तिचा मित्र लव्या जोशी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून  एका सफारीने त्यांच्या स्कूटीला धडक दिल्याचे त्यात दिसत आहे. धडक लागल्यानंतर तरुणींना काही अंतरापर्यंत कार चालकानं फरफटत नेल्याचेही समोर आलेय. दरम्यान, पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून त्या कारवर पोलिसांचे स्टिकर असल्याचे म्हटले जातेय.

सफारी कार एका चौकातून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. हर्षिता वर्मा नावाची तरुणी आपल्या मैत्रिणीला सोडण्यासाठी जात अस असतानाच एका शाळेनजीक ही घटना घडली. यात हर्षिताचा जागीच मृत्यू झाला.इतकंच नाही तर आणखी एक व्हिडीओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अपघातानंतर सफारी कारचा चालक वेगाने घेऊन जाताना दिसतोय. तसंच स्कूटर चालकही त्याला त्याचा पाठलाग करुन थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. परंतु सफारी कार चालकाने कार वेगाने पुढे नेली.

आरोपी कार चालकाला कारसह अटक करण्यात आली आहे. किरण जोशी असे त्याचे नाव आहे. तो मुळात पिथौरागढचा रहिवासी आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सफारी कारच्या वर पोलीस असे लिहिण्यात आले आहे. सफारी कार एका पोलीस उपनिरीक्षकाची असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ती काही महिन्यांपूर्वी एका ऑटो डीलरला विकण्यात आली होती.

टॅग्स :Accidentअपघात