शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध वडिलांचा सांभाळ मुलगा नाकारू शकत नाही, हे तर त्याचे पवित्र कर्तव्य - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 12:48 IST

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुलगा मनोज कुमार याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

रांची : वृद्ध वडिलांना सांभाळणे, हे मुलाचे पवित्र कर्तव्य आहे. या कर्तव्याला तो नाकारू शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण टिप्पणीसह, न्यायालयाने कोडरमा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यात मोठ्या मुलाला वडिलांच्या देखभाल खर्चासाठी दरमहा ३ हजार रुपये देण्यास सांगितले होते. 

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुलगा मनोज कुमार याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुभाष चंद यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश योग्य ठरवत याचिका फेटाळून लावली.

वडिलांचे म्हणणे... वडिलांनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटले होते की, त्यांच्याकडे तीन एकरांपेक्षा जास्त जमीन होती. १९९४ मध्ये त्यांनी मोठा मुलगा प्रदीप कुमार आणि धाकटा मुलगा मनोज कुमार यांच्यात जमिनीची समान वाटणी केली. ते त्यांचा मोठा मुलगा प्रदीप कुमारसोबत राहतात. मोठा मुलगा त्यांना आर्थिक मदतही करतो. याउलट धाकटा मुलगा मनोज कुमार याने गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्याकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर शाब्दिक शिवीगाळ करून त्यांना मारहाण करून जखमीही केले.

कोर्टाने म्हटले...हिंदू धर्मातील नियमांचा हवाला देत हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, ‘जर तुमचे आई-वडील खूश असतील तर तुम्हीही खूश असाल, मात्र जर ते दु:खी असतील तर तुम्हालाही दु:खी वाटते. पिता हे तुमचा देव आणि आई तुमचे रूप आहे. ते बीज आहेत तर तुम्ही झाड आहात. तुम्हाला तुमच्या पालकांचे चांगले आणि वाईट दोन्ही वारशाने मिळतात. एखाद्या व्यक्तीवर जन्माला आल्यावर काही ऋण असतात आणि त्यात वडील आणि आईचे ऋण (आध्यात्मिक) देखील समाविष्ट असते, जे आपल्याला फेडायचे आहे.’ 

असा झाला निवाडा...वडिलांनी न्यायालयात सांगितले की, मनोज कुमार गावात दुकान चालवतो आणि दरमहा ५० हजार रुपये कमावतो. याशिवाय, त्यांना शेतजमिनीतून दरवर्षी २ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. लहान मुलाच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा १० हजार रुपये द्यावेत, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. सत्र न्यायालयाने वडिलांच्या बाजूने निर्णय दिला आणि मुलाला दरमहा ३ हजार रुपये देखभाल खर्चासाठी देण्यास सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय