शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 10:41 IST

सध्या देशातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे.

iphone Viral News : समाजात अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची सोशल मीडियावर फार चर्चा रंगते. अनोखा अपघात असो की मग अतिउत्साही तरूण-तरूणीची रिल्स. सध्या देशातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. या वर्षाच्या पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही अनेकदा उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या निरपराध लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्य पाहिले असेलच, पण मोबाईल फोनच्या रेस्क्यू ऑपरेशनची विचित्र घटना घडली आहे. खरे तर केरळमधील वर्कला येथे घडलेली ही घटना खरोखरच मनोरंजक आहे.

कर्नाटकातील एक महिला येथे फिरायला आली होती. समुद्रकिनारी दगडांमध्ये उभी राहून ती निसर्गाचा आनंद घेत होती. अशातच या महिलेचा आयफोन समुद्रकिनाऱ्यावरील दगडांमध्ये पडला. यानंतर अग्निशमन दलाकडून सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून दीड लाख रुपये किमतीचा फोन वाचवण्यात आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

७ तास चालले बचावकार्यसंबंधित महिलेने ती राहत असलेल्या रिसॉर्टमधील लोकांकडे मदत मागितली. स्थानिकांनी तात्काळ केरळ अग्निशमन आणि बचाव सेवेला मदतीसाठी कॉल केला. त्यानंतर ७ तास ऑपरेशन सुरू राहिल्याने अथक प्रयत्नांनंतर त्यांनी फोन बाहेर काढला. रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून घटनेची माहिती दिली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की फोन काढण्यासाठी कसा प्रयत्न केला जात आहे. 

दरम्यान, या अनोख्या बचाव कार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देऊन या घटनेवर व्यक्त होत आहेत. काहींनी मिश्किल प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. तर अनेकांनी संबंधित महिलेवर हलगर्जीपणाचा आरोप लगावला. 

टॅग्स :KeralaकेरळSocial Viralसोशल व्हायरल