शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:29 IST

देशभरात 12 नवीन औद्योगिक शहरे उभारण्यास केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. याद्वारे 10 लाख प्रत्यक्ष आणि 30 लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.28) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेटर नोएडाच्या धर्तीवर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम (NICDP) अंतर्गत देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामुळे 10 लाख लोकांना थेट रोजगार मिळेल.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 राज्यांमध्ये 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यावर 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. प्रस्तावित 12 औद्योगिक स्मार्ट शहरांमधून 1.52 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील.

कोणत्या शहरांना फायदा होईल?या निर्णया अंतर्गत 9 राज्यांमध्ये 6 प्रमुख कॉरिडॉर तयार केले जातील. देशाची उत्पादन क्षमता आणि आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ही औद्योगिक शहरे उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमधील राजपुरा-पटियाळा, महाराष्ट्रातील दिघी, केरळमधील पलक्कड, उत्तर प्रदेशमधील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणामधील झहीराबाद, आंध्र प्रदेशमधील ओरवाकल, कोपर्थी आणि राजस्थानमधील जोधपूर-पाली येथे उभारण्यात येतील.

40 लाख रोजगार उपलब्ध होणारनॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत, या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नियोजित औद्योगिकीकरणाद्वारे सुमारे 10 लाख लोकांसाठी प्रत्यक्ष नोकऱ्या आणि 30 लाख लोकांपर्यंत अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. 

रेल्वेच्या तीन पायाभूत प्रकल्पांना मंजुरीरेल्वेच्या तीन पायाभूत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने कृषी निधीत वाढ केली आहे. ॲग्री इन्फ्रा फंड 2020 मध्ये सुरू झाला, ज्याचा निधी 1 लाख कोटी रुपये होता. याशिवाय 234 शहरांमध्ये एफएम रेडिओ सुविधा सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासाठी 730 वाहिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक