शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीला अर्पण केलेला लाडू १ कोटी ८७ लाखांना विकला; दरवर्षी होतो लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 12:37 IST

दरवर्षी हैदराबादमधील एक संस्था गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या लाडूंचा लिलाव करते. यावेळी त्यांचा लिलाव झालेला ५ किलोचा लाडू दीड कोटींहून अधिक रुपयांना विकला आहे.

गणेशोत्सव देशभरात धुमधडाक्यात झाला. गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दानपेटीत दान केले जाते. काही ठिकाणी सोन, चांदीही दान केले जाते. हैदराबादमधील एका मंडळाला लाडू अर्पण केला, पण या लाडूची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. लिलावात  या लाडूला मोठ्या प्रमाणात किंमत मिळाली आहे. हा लाडू शंभर किंवा हजार रुपयांचा नसून करोडो रुपयांना विकला. हैद्राबादच्या बंदलागुडा येथील किर्ती रिचमंड व्हिला येथे गणेश उत्सवादरम्यान दिले जाणारे लाडू लिलावासाठी ठेवण्यात आले होते. 

Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?

सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लाडूच्या लिलावात तो अंदाजे १.८७  कोटींना विकला. गेल्या वर्षीच्या किमतीपेक्षा ही किंमत ६१ लाख रुपयांनी अधिक आहे. गेल्या वर्षी या लाडूचा लिलाव १.२६ कोटी रुपयांना झाला होता. करोडोंना विकल्या जाणाऱ्या या लाडूचे वजन पाच किलो आहे.

कीर्ती रिचमंड व्हिलाच्या लाडूची जोरदार चर्चा असते. सर्वात महागडा लाडू असा विक्रम केला आहे. २०१९ मध्ये लिलाव सुरू झाला यामध्ये लाडूची किंमत १८.७५ लाख रुपये होती. यानंतर, २०२० मध्ये  २७.३ लाख, २०२१ मध्ये ४१ लाख, २०२२ मध्ये  ६० लाख आणि २०२३ मध्ये १.२६ कोटी रुपयांची बोली लावण्यात आल्या.

व्यवस्थापकीय विश्वस्त अभय देशपांडे यांनी सांगितले की, लोकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. विविध धार्मिक पार्श्वभूमीतील १०० हून अधिक व्हिला मालकांनी लिलावात भाग घेतला, यात ४०० हून अधिक बोली लागल्या. दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान आयोजित केलेला हा अनोखा चॅरिटी लिलाव गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

या क्राउडफंडिंग प्रयत्नामुळे ४२ पेक्षा जास्त एनजीओ, वंचित शाळकरी मुले आणि गरजूंना फायदा होतो. आर.व्ही. दिया चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व काम स्वयंसेवकांद्वारे शून्य प्रशासकीय खर्चासह केले जाते, असंही  अभय देशपांडे म्हणाले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024