शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! एक वर्षाच्या चिमुकल्याने सापाला चावून ठार केलं; खेळता खेळता घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 20:14 IST

एक वर्षाच्या मुलाने सापाला खेळणे समजून त्याच्याशी खेळायला सुरुवात केली अन् त्याचा जीव घेतला.

सोशल मीडियाच्या या जगात अनोख्या घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत असतात. अशीच एक अनोखी घटना समोर आली आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. इथे एक वर्षाच्या मुलाने सापाला खेळणे समजून त्याच्याशी खेळायला सुरुवात केली अन् त्याचा जीव घेतला. खेळता खेळता त्याने सापाला चावा घेतला आणि त्याला चावून मारले. त्यानंतर जेव्हा आईची नजर मुलावर पडली, तेव्हा ते पाहून ती देखील खूप घाबरली. भीतीपोटी संबंधित माऊली आपल्या मुलाला घेऊन इस्पितळात गेली. 

दरम्यान, मुलाने ज्या सापाला चावा घेतला तो साप विषारी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळेच सुदैवाने चिमुकल्याचे प्राण वाचले. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. डॉक्टरांनी हे सांगताच आईचा जीव जीवात आला. खरे तर सापाचा चावा घेतल्याने संबंधित चिमुकल्याचे दात दुखत आहेत. मात्र, एक वर्षाच्या मुलाने खेळताना सापाचा जीव कसा घेतला यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, चिमुकला अंगणात खेळत होता. ती देखील तिथेच होती. पण, अचानक तिची आपल्या मुलावर नजर पडली अन् ती अवाक् झाली. मुलाच्या हातात साप पाहून ती घाबरली. आपल्या मुलाने तोंडात साप धरला आहे यावर काही क्षण तिचा विश्वासच बसला नाही. मग तिने मुलाच्या तोंडातून साप काढला आणि फेकून दिला. साप मेला होता हे पाहून तिने मोकळा श्वास घेतला पण तिला साप मेला कसा याचीही चिंता सतावत होती. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. एक वर्षाच्या मुलाचा कारनामा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यानंतर मृत सापाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरल