शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:38 IST

राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया, आणि मदन लाल यांच्यासह एकूण 7 आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली...

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या पाच दिवस आधीच आपच्या 7 आमदारांनी राजीनामा दिला आहे. पक्षाने या सातही आमदारांचे तिकीट कापले होते. यामुळे हे आमदार नाराज होते. राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया, आणि मदन लाल यांच्यासह एकूण 7 आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली. 

जनकपुरीचे दोन वेळचे आमदार राजेश ऋषी -जनकपुरी येथून दोन वेळा आमदार राहिलेले राजेश ऋषी यांनी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या राजेश ऋषी यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात, "पक्ष आपले मूलभूत सिद्धांत सोडून भ्रष्टाचारात बुडाला आहे. संतोष कोळी यांच्या खुन्याला तिकीट देण्यात आले, हा पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वासघात आहे," असा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर "आम आदमी पक्ष एका अनियंत्रित टोळीसाठी स्वर्ग बनला आहे. पक्षाचे नेतृत्व हे भ्रष्टाचार, घराणेशाही आणि हुकूमशाहीचा समानार्थी शब्द बनला आहे," असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

महरौलीचे आमदार नरेश यादव -मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनीही पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनामा दिला आहे. नरेश यादव यांना पक्षाने तिकीट दिले होते, परंतु नंतर ते मागे घेण्यात आले. नरेश यादव यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, "भारतीय राजकारणाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराविरुद्धच्या अण्णांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र आता मला अत्यंत दुःख होत आहे की, आम आदमी पक्ष भ्रष्टाचार अजिबात कमी करू शकला नाही, उलट आम आदमी पक्ष स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे."

त्रिलोकपुरीचे आमदार रोहित कुमार -त्रिलोकपुरी येथील आम आदमी पक्षाचे आमदार तथा दलित नेते रोहित कुमार मेहरौलिया यांनीही राजीनामा दिला आहे. यावेळी पक्षाने त्यांचेही तिकीट कापले होते. ते अण्णा आंदोलनापासून आदमी पक्षात होते. रोहित यांनी 'X'वर आपल्या राजीनाम्याची प्रत शेअर केली आहे. यात, "ज्यांना बाबासाहेबांचा केवळ फोटो हवा आहे, त्यांचे विचार नकोत! आजपासून, अशा संधीसाधू लोकांसोबतचे माझे नाते संपले. मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे."

पालमच्या आमदार भावना गौड -पालम मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार भावना गौर यांनीही राजीनामा दिला आहे. यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांनी पाच ओळींचा राजीनामा पाठवला यात, आता आपल्याला अरविंद केजरीवाल आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही, असे म्हणण्यात आले आहे. याशिवाय, कस्तूरबा नगरचे आमदार मदन लाल, बिजवासनचे आमदार भूपेंद्र सिंह जून आणि आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा यांनीही पक्षावर आणि रक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025