शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिममध्ये २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अचानक खाली कोसळला; काही सेकंदातच जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 13:37 IST

हा पोलीस हवालदार हैदराबादमधील आसिफ नगर पोलीस ठाण्यात तैनात होता. गुरुवारी सकाळी विशाल व्यायाम करण्यासाठी जिममध्ये पोहोचला.

हैदराबाद -  गेल्या काही वर्षांत देशात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्येही बहुतांश मृतांमध्ये कमी वय असलेल्या तरुणांचा समावेश होता. गुरुवारी असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे जिममध्ये व्यायाम करताना २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विशाल असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. 

हा पोलीस हवालदार हैदराबादमधील आसिफ नगर पोलीस ठाण्यात तैनात होता. गुरुवारी सकाळी विशाल व्यायाम करण्यासाठी जिममध्ये पोहोचला. व्यायाम करत असताना तो अचानक जमिनीवर पडला आणि पुन्हा उठलाच नाही. विशालला जमिनीवर पडताना पाहून जिममध्ये व्यायाम करत असलेले बाकीचे लोकही हैराण झाले. विशालला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. १६ वर्षीय भाची वृंदा त्रिपाठी २५ जानेवारी रोजी उषा नगर येथील छत्रपती शिवाजी शाळेत पायी जात असताना खाली पडली. पडल्यानंतर वृंदाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले, पण तिला शुद्ध आली नाही. यानंतर, त्यांना घाईघाईने तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच तिचा श्वास थांबला होता. त्यानंतरही डॉक्टरांनी सीपीआर व इतर उपाय केले पण वृंदा शुद्धीवर आली नाही.शेवटी तिला मृत घोषित करण्यात आले असं स्थानिक रहिवासी राघवेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले. वृंदा पूर्णपणे बरी असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तिला कोणतीही समस्या नव्हती. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, कडाक्याच्या थंडीमुळे वृंदाला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.

स्कूटी चालवताना एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ८ दिवसांपूर्वी राजस्थानच्या जोधपूर इथं व्यापारी सुरेश वाटवानी हे त्यांच्या दुकानापासून हाकेच्या अंतरावर त्यांच्या स्कूटीवरून जात होते. अचानक छातीत दुखू लागले आणि स्कूटीवरून खाली पडले. आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी धावत जाऊन वाटवानी यांना थेट रुग्णालयात नेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका