शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 95 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 03:08 IST

साथ नियंत्रणात; सक्रिय रुग्णांचे प्रमाणही कमी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची साथ नियंत्रणात येत असून बरे होणाऱ्यांची संख्या ९५ लाख तर त्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.  गेल्या सलग दहा दिवसांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांहून कमी असून त्यांचे प्रमाण ३.३४ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कोरोनाचे २६,३८२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९९.३२ लाख झाली. बरे झालेल्यांची संख्या ९४,५६,४४९ तर प्रमाण ९५.२१ टक्के आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९९,३२,५४७ आहे. या संसर्गाने आणखी ३८७ जण मरण पावले असूून बळींची संख्या १,४४,०९६ झाली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३,३२,००२ तर मृत्युदर अवघा १.४५ टक्के आहे. अमेरिकेत ६८ लाख सक्रिय रुग्ण असून ३ लाख ११ हजार जणांचा बळी गेला आहे. जगभरात ७ कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ५ कोटी १८ लाख लोक बरे झाले आहेत.  अमेरिकेत २ लाख नवे रुग्णअमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २ लाख ४८ हजार नवे रुग्ण आढळून आले. ही या प्रकारची त्या देशातील सर्वाधिक संख्या आहे. याच कालावधीत अमेरिकेत कोरोनाने २,७०६ जण, तर भारतामध्ये ४०० हून कमी लोक मरण पावले.   बारापैकी एका ओळखपत्राद्वारे होणार लस घेणाऱ्याची नावनोंदणी-  एस. के. गुप्तानवी दिल्ली :  लस टोचून घेणाऱ्या व्यक्तीने मतदारपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहनचालक परवाना आदी १२ ओळखपत्रांपैकी एखादे ओळखपत्र सादर करायचे आहे. या ओळखपत्राच्या आधारे ‘को-विन अ‍ॅप’वर नावाची नोंदणी होईल.कोरोना लसीकरणाच्या मोहिमेसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (को-विन) या अ‍ॅपच्या मदतीने या लसीचा साठा व वितरणाबाबतची ताजी माहिती केंद्र सरकारला मिळणार आहे. तसेच कोणाला लस टोचली व अजून किती व्यक्ती बाकी आहेत? याचाही तपशील या अ‍ॅपद्वारे समजू शकणार आहे. महिलांना लस टोचताना त्या केंद्रावर महिला कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. लसीच्या साठवणुकीसाठी केंद्र सरकारने काही नियम आखून दिले आहेत. थेट सूर्यप्रकाशाशी या लसींचा संबंध येणार नाही अशा रीतीने त्यांची साठवणूक करण्यास सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या