शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

९१८ उमेदवार रिंगणात; १० कोटी मतदार आज बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 05:36 IST

सातवा टप्पा । ५९ मतदारसंघांत मतदान; दिगज्जांचे भवितव्य होणार यंत्रबंद

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी रविवारी मतदान होत आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात येत आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. ९१८ उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे १० कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण २३ मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (८), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (३), मध्य प्रदेश (८), पंजाब (१३), उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (९)या राज्यांसह चंदीगड (१)या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होणार आहे.या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना कॉँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे.

बिहारच्या पाटणासाहिब मतदारसंघातून नुकतेच कॉँग्रेसवासी झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे मैदानात आहेत. त्यांच्या विरोधामध्ये भाजपने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. मागील दोन निवडणुका भाजपकडून जिंकलेले शत्रुघ्न सिन्हा यंदा हॅट्ट्रीक करू शकणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघामधून भाजपने अभिनेते सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसतर्फे विद्यमान खासदार सुनील जाखड हे मैदानात आहेत. चंदीगडमधून भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर आणि कॉँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पवन कुमार बन्सल यांच्यामध्येही चुरशीची लढत होत आहे.

याशिवाय केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा (गाझीपूर), अनुप्रिया पटेल (मिर्झापूर),हरसिमरत कौर बादल (भटिंडा), राम कृपाल यादव (पाटलीपुत्र), भोजपुरी अभिनेते रवीकिशन (गोरखपूर), लालु प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती (पाटलीपुत्र ), लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार (सासाराम), झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (डुमका), माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भुरिया(रतलाम), पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल (फिरोझपूर), कॉँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी (आनंदपूर साहिब), ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (डायमंड हार्बर) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस(कोलकाता दक्षिण)हे महत्वाचे नेते मैदानात आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवारया टप्प्यातील १९ टक्के (१७०) उमेदवारांच्या विरोधात फौजदारी खटले आहेत. यापैकी १२७ जणांवर (१४ टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. असे सर्वाधिक उमेदवार ४३ पैकी १८ भाजपचे (४२ टक्के) आहेत. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे ४५ पैकी १४ ( ३१ टक्के), आपचे २१ टक्के, बसपा (१५ टक्के) तर अपक्ष ९ टक्के यांचा क्रमांक लागतो, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) अहवालात दिली. ५९ पैकी ३३ मतदारसंघ अतिसंवेदनशील जाहीर केले आहेत.एडिआर रिपोर्ट काय म्हणतो?कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे ४५ पैकी ४०(८९%) उमेदवार करोडपती आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे ४३ पैकी ३२ (८४%) उमेदवार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ६४ टक्के करोडपती असलेले आप आहे. या पक्षाच्या १४ पैकी ९ उमेदवारांकडे एक कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे. बसपा २८ टक्के तर १९ टक्के अपक्ष उमेदवारही करोडपती आहेत. या टप्प्यातील उमेदवारांकडील सरासरी संपत्ती ४.१९ कोटी रुपयांची आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९