शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के शिक्षण महाविद्यालयांत नाहीत नियमानुसार शिक्षक

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

नागपूर विद्यापीठाचे प्रतिज्ञापत्र : नेट/सेट उमेदवारांच्या अभावाचे कारण

नागपूर विद्यापीठाचे प्रतिज्ञापत्र : नेट/सेट उमेदवारांच्या अभावाचे कारण

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत कार्यरत सुमारे ९० टक्के एम. एड. व बी. एड. महाविद्यालयांमध्ये नियमानुसार पूर्णवेळ नियमित शिक्षक नाहीत अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती अन्य कोणीही नाही तर, नागपूर विद्यापीठानेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्रावर दिली आहे.
नियमानुसार एम.एड. व बी.एड. महाविद्यालयांमध्ये ५० विद्यार्थ्यांमागे ८ पूर्णवेळ नियमित शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. परंतु, सुमारे ९० टक्के महाविद्यालयांत या नियमाची पूर्तता झालेली नाही. यामुळे नागपूर विद्यापीठाने २४ जुलै २०१४ रोजी अधिसूचना जारी करून पाच वर्षे पूर्ण झालेल्या महाविद्यालयांनी ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करावी व अन्य महाविद्यालयांनी किमान एक पूर्णवेळ नियमित शिक्षक नेमावा अशी सूचना केली आहे. याशिवाय टप्प्याटप्प्याने १०० टक्के शिक्षक नियुक्त करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या महाविद्यालयांची मान्यता काढून घेण्यात येईल असा इशारा अधिसूचनेत देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. नेट/सेट उमेदवार मिळत नसल्यामुळे शिक्षक नियुक्तीच्या नियमावर काटेकोरपणे अंमलबजावणी करणे शक्य नाही असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांनी जाहिराती देऊनही पदे रिक्त राहतात असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
गुरुवारी प्रकरणावरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील भानुदास कुलकर्णी यांनी नियम न पाळणाऱ्या महाविद्यालयांत विद्यार्थी प्रवेशावर स्थगिती द्यावी अशी विनंती केली होती. परंतु, न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विनंती अमान्य केली. या प्रकरणावर ३ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
यासंदर्भात डॉ. साधना माकडे व इतर चौघांनी जनहित याचिका दाखल केली आहे. नागपूर विद्यापीठांतर्गत ११९ बी.एड. व ५६ एम. एड. महाविद्यालये कार्यरत आहेत. यापैकी ५२ एम.एड. व ४० बी.एड. महाविद्यालयांमध्ये एक ही शिक्षक नाही. ही महाविद्यालये संचालित करणाऱ्या शिक्षण संस्था शिक्षक नियुक्तीचे नियम पाळत नाहीत पण, विद्यार्थ्यांना १०० टक्के प्रवेश देतात. नियमांची पायमल्ली केली जात असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. नागपूर विद्यापीठातर्फे ॲड. रणजित भुईभार यांनी बाजू मांडली.