शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

"१८ कोटी खर्चून बांधला हा अद्भुत नमुना"; भोपळमध्ये ९० अंशाचे वळण असलेल्या पुलावरुन नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:16 IST

भोपाळमध्ये बनलेल्या या नव्या पुलामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Bhopal Railway Overbridge: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका पुलाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. भोपाळच्या ऐशबाग स्टेडियमजवळ एक नवीन रेल्वे ओव्हरब्रिज जवळपास तयार झाला आहे. मात्र आता तो सुरु होण्यापूर्वीच वाद सुरू झाला आहे. हा वाद काम वेळेवर पूर्ण न होण्याबद्दल किंवा खर्च वाढण्याबद्दल नाही तर त्याच्या डिझाइनबद्दल आहे. ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावरील धोकादायक ९० अंशाच्या वळणाने लोकांना धक्का बसला आहे. या पुलाचे ९० अंशाचे वळण अपघातांचे मोठे कारण बनू शकते असं लोकांचे म्हणणं आहे. मात्र यावर सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भोपाळमध्ये बांधलेला हा ऐशबाग रेल्वे ओव्हरब्रिज धोकादायक वळणामुळे उद्घाटनापूर्वीच वादात सापडला आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित करत ९० अंशांच्या वळणामुळे भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लोकांनी पुलाच्या डिझाइनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनचालकांना अचानक ९० अंशांवर वाहन वळवण्यात अडचणी येऊ शकतात असं लोकांचे म्हणणं आहे. नेटकऱ्यांनी या पुलाच्या कामावरुन सरकारवर टीका केलीय.

"भोपाळचा हा ऐशबाग रेल्वे ओव्हर ब्रिज, जो पीडब्ल्यूडीने १० वर्षांत बांधला आहे, तो एका चमत्कारासारखा आहे. हा पूल केवळ वाहतूक कोंडीचे एक नवीन केंद्र बनणार नाही तर हे वळण एका मोठ्या अपघातालाही आमंत्रण देईल. ज्यांना दररोज हा पूल ओलांडावा लागेल त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. कारण हा पूल बनवणाऱ्यांनी फक्त औपचारिकता पूर्ण केल्या आहेत, जबाबदारी नाही, असं मनिष चौधरी नावाच्या युजरने म्हटलं. दुसऱ्या एका युजरने, ठ९० अंश कोनातून मृत्यू येईल. विकासाचा हा कोन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उदयास आला आहे. यासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असं म्हटलं. आणखी एका युजरने कडक सूचना, ही तंत्रज्ञान देशाबाहेर जायला नको. हा अद्भुत नमुना १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे, असा टोमणा लगावला.

दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांना पुलाच्या डिझाइनबद्दल प्रश्न विचारला होता. "पुलाच्या बांधकामानंतर अचानक काही तज्ञ पुढे आले आहेत आणि त्यांनी बोलणे सुरू केले आहे. तर कोणताही पूल बांधताना अनेक तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात.जर असे आरोप झाले तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल," असं मंत्री राकेश सिंह म्हणाले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश