शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अॅम्ब्युलन्स नाकारल्याने 9 वर्षाच्या नातीचा मृतदेह नेला खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 12:27 IST

हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने एका आजोबांना त्यांच्या 9 वर्षाच्या नातीचा मृतदहे खांद्यावर न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत

फरिदाबाद, दि. 15- रूग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह घरी नेण्यासाठी हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स द्यायला नकार देण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. याचसंदर्भातील आणखी एक घटना समोर आली आहे. हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने एका आजोबांना त्यांच्या 9 वर्षाच्या नातीचा मृतदेह खांद्यावर न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने त्यांना नातीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावा लागला. 

 

गेल्या दोन दिवसांपासून लक्ष्मी या 9 वर्षाच्या मुलीला ताप येत होता. शनिवारी सकाळी तिला शहराती बादशाह खान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करायला नकार दिला आणि नंतर तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घरी न्यायला डॉक्टरांनी सांगितलं पण मृतदेह घरी नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स दिली नाही, अशी माहिती पोलिस प्रवक्त्यांनी दिली आहे. खाजगी अॅम्ब्युलन्ससाठी पैसे नसल्याने त्या मुलीच्या आजोबांनी तिचा मृतदेह खाद्यांवर घेऊन ते घरी निघाल्याचंही पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात तेथिल स्थानिक पत्रकाराने हस्तक्षेप करून त्या कुटुंबाला खाजगी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि तिचा मृतदेह घरी नेण्यात आला. लक्ष्मीला ताप येत असल्याने आधी तिच्या आजोबांनी तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं होतं पण पैसे नसल्याने त्यांना हॉस्पिटलमधून उपचार मिळाले नाहीत, असंही पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. 

आणखी वाचा

 

"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार

जम्मू काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

अमेरिकेने ISIS चा म्होरक्या अबू सैय्यदला केलं ठार

दरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृताच्या कुटुंबियांना अॅम्ब्युलन्स नाकारल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. ओडिशामध्ये हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने दाना मांझी यांना त्यांचा पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किलोमीटरची पायपीट करावी लागली होती. तर काही दिवसांपूर्वीच झारखंडमध्ये एका कुटुंबाला हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स द्यायला टाळाटाळ झाल्याने त्यांनी मृत मुलीचा मृतदेह हातगाडीवरून नेला होता.