शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये २ महिन्यांचं बाळ

By कुणाल गवाणकर | Updated: October 14, 2020 08:33 IST

एसडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य सुरू; पावसाचा जोर कायम असल्यानं मदतकार्यात अडथळे

हैदराबाद: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये संरक्षक भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका २ महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. सध्या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. कोसळलेल्या भिंतीखाली काही जण अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.हैदराबादच्या मोहम्मदिया परिसरात संरक्षक भिंत काही घरांवर कोसळली. रात्री उशिरा ही घटना घडली. यामध्ये ९ जणांनी जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्यानं परिसरात पाणी साचलं आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी ट्विट करून घटनेची आणि मदतकार्याची माहिती दिली. 'मुसळधार पावसामुळे बंदलागुडातल्या मोहम्मदिया हिल्स परिसरातली भिंत कोसळली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत,' असं ट्विट ओवेसींनी केलं आहे. याशिवाय हैदराबादजवळ असलेल्या इब्राहिमपटनम भागातल्या एका जुन्या घराचं छत कोसळलं. यामध्ये एका ४० वर्षीय महिलेचा आणि तिच्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तेलंगणात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अट्टापूर मेन रोड, मुशीराबाद, टोली चौकी, दम्मीगुडासह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एसडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.