शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

8th Pay Commission latest Updates: आठव्या वेतन आयोगाचे वारे? केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४४ टक्क्यांनी पगारवाढ हवीय; सरकारला प्रस्ताव देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 15:54 IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जेवढ्या शिफारसी सातव्या वेतन आयोगात सुचविण्यात आल्यात त्यापैकी कमीच शिफारसी लागू करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना करत आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी १८ महिन्यांच्या वाढीव डीएपेक्षाही मोठी बातमी आहे. संघटनांमध्ये आठव्या वेतन आयोगाचे वारे सुरु झाले आहेत. सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झालेल्या असतानाच आता भरमसाठ पगारवाढीचे स्वप्न या संघटना पाहू लागल्या आहेत. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जेवढ्या शिफारसी सातव्या वेतन आयोगात सुचविण्यात आल्यात त्यापैकी कमीच शिफारसी लागू करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना करत आहेत. अशातच हे कर्मचारी आता आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत. कर्मचारी संघटनांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन तयार करण्यात येत असून, ते लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. शिफारशींनुसार पगार वाढवावा किंवा ८ वा वेतन आयोग आणा, अशी मागणी या निवेदनात कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. मात्र, सरकारने आधीच लोकसभेत आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताही विचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. असे असतानाही सरकार यावर चर्चा करेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना वाटत आहे. 

सध्या किमान वेतन मर्यादा 18,000 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये वाढीमध्ये फिटमेंट फॅक्टरला खूप महत्त्व देण्यात आले आहे. सध्या हा घटक 2.57 पट आहे. 7 व्या वेतन आयोगात तो 3.68 पट ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. यावर सरकारने सहमती दर्शवल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होईल. असे झाल्यास पगारवाढ ही 44.44% टक्क्यांवर जाईल असा या संघटनांचा अंदाज आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगानंतर नवा वेतन आयोग येणार नाही. त्याऐवजी सरकार अशी यंत्रणा राबविण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होईल. डीए 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पगारात आपोआप वाढ होणार आहे. असे झाल्यास 68 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट फायदा होणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार