शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारऐवजी अवघे ८९८ मानसशास्त्रज्ञ! आरोग्य विभागाची आकडेवारी, मानसिक उपचार व्यवस्थेचे विदारक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:42 IST

संपूर्ण देशाला सध्या एकूण २०,२५० मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. परंतु आज देशाच्या सरकारी आरोग्य विभागाकडे केवळ ८९८ मानसशास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. तसेच सध्या ३७ हजार मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांची गरज असताना देशात केवळ ९०० कार्यकर्ते उपलब्ध आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला सध्या एकूण २०,२५० मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. परंतु आज देशाच्या सरकारी आरोग्य विभागाकडे केवळ ८९८ मानसशास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. तसेच सध्या ३७ हजार मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांची गरज असताना देशात केवळ ९०० कार्यकर्ते उपलब्ध आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०१५ मध्ये देशाला एकूण १३,५०० मानसशास्त्रज्ञांची गरज असताना त्या घडीला केवळ ३,८२७ उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत त्यांना देशात मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाºया व्यावसायिकांची संख्या कमी असण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, देशाला सध्या ३००० मानसिक उपचार परिचारिकांची गरज असताना केवळ १५०० उपलब्ध आहेत.सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात२०११ च्या जनगनणेनुसार देशात ७.२२ लाख लोक मानसिक व्याधींनी ग्रस्त असल्याचे आणि १५ लाखांहून अधिक लोक बौद्धिकदृष्ट्या अक्षम असल्याचे आढळून आले होते.उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक ७६,६०३ लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त आढळले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ७१,५१५, केरळमध्ये ६६,९१५ तर महाराष्ट्रात ५८,७५३ लोक मानसिक व्याधींनी ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य