शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 05:45 IST

जगातील सर्वांत कमी प्रमाण; ९६.५३ टक्के लोक झाले बरे; देशात २ लाख १३ हजार रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांत भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण सापडत असून, हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. या आजारातून एक कोटी एक लाख ६२ हजारांहून अधिक लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९६.५३ टक्के आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी आहे. 

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी देशात १५,५९० नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०५२७६८३ झाली आहे. त्यातील १०१६२७३८ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी या आजारामुळे आणखी १९१ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या १५१९१८ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २१३०२७ आहे.जगभरात कोरोनाचे नऊ कोटी ३६ लाख रुग्ण असून, त्यातील सहा कोटी ६९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेमध्ये दोन कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील एक कोटी ४१ लाख जण बरे झाले. 

५० वर्षे वयापुढील नागरिकांच्या आकडेवारीसाठी मतदारयाद्यांचा वापरलसीकरणासाठी प्राधान्य गटात असलेल्या ५० वर्षे वयापुढील नागरिकांची नेमकी संख्या कळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ताज्या लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदार याद्यांतील नोंदी तपासल्या जाणार आहेत. लसीकरणासाठी ५० वर्षे वयापुढील व्यक्तींची मिळवलेली माहिती ही मोहीम संपल्यानंतर केंद्रीय आरोग्य खात्याने त्यांच्या नोंदीमधून काढून टाकावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे की,  निवडणूक आयोगाने सरकारला मदत करावी. 

मृत्यूदर कमी असलेल्या देशांमध्ये भारतभारतामधील कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. गेल्या सात दिवसांमध्ये भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे केवळ एक जण कोरोनामुळे मरण पावला आहे.  जगात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या