शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यात अवघे ८.३ टक्के मतदान; लेह-लडाख, राजौरी, जम्मूमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 02:39 IST

जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पहिला टप्पा सोमवारी शांततेत पार पडला. काश्मीर खो-यामध्ये अवघे ८.३ टक्के मतदान झाले; मात्र राजौरी, लेह-लडाख, जम्मू भागामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पहिला टप्पा सोमवारी शांततेत पार पडला. काश्मीर खोºयामध्ये अवघे ८.३ टक्के मतदान झाले; मात्र राजौरी, लेह-लडाख, जम्मू भागामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावला. राजौरी येथे सर्वाधिक ८१ टक्के व कारगिलमध्ये ७८.२ टक्के मतदान झाले. या निवडणुकांवर नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी तसेच फुटीरतावादी संघटनांनी घातलेला बहिष्कार, दहशतवादी हिंसक कारवाया करण्याची शक्यता यांचे सावट होते.कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काश्मीर खोºयातील अनंतनागमध्ये ७.३, बडगाममध्ये १७, बांदीपोरामध्ये ३.४, बारामुल्लात ५.१, कुपवाडात ३२.३, श्रीनगरमध्ये ६.२ मतदान झाले. लेहमध्ये मात्र ५५.२, जम्मूमध्ये ६३.८ आणि पूंछमध्ये ७३.१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. या पहिल्या टप्प्यात ७८ उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले असून त्यापैकी ६९ जण काश्मीर खोºयातील आहेत. मतदानाच्या दिवशी, आज फुटीरतावादी संघटनांनी बंद पुकारल्याने काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. श्रीनगरमधील दुकाने, औद्योगिक आस्थापने, खासगी कार्यालये, पेट्रोल पंप सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहने धावत होती. त्यामुळे लोकही फारसे घराबाहेर पडलेच नाहीत. (वृत्तसंस्था)भाजपाचा उमेदवार जखमीजम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १५ मधून निवडणूक लढवित असलेले भाजपाचे उमेदवार आदिल अहमद बेहरू हे समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाले. दाचीगाम येथे ते मतदानासाठी जात असताना ही घटना घडली. बांदिपोरा जिल्ह्यात मतदान सुरू असताना काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJammu Kashmirजम्मू-काश्मीर